परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्ट पर्यंत वाढ - धनंजय मुंडे
परदेश शिष्यवृत्ती साठी सन २०२० - २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवुन आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती साठी सन २०२० - २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवुन आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना श्री . मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता १५ दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतचा अडचणी ही आता सोडविल्या आहेत .
Social Justice Department Extension of Application Deadline for Foreign Scholarship till 28th August - Dhananjay Munde
MUMBAI: The deadline for students seeking benefits in the new academic year 2020-21 has been extended by 15 days from August 15 to August 28 in the wake of the Corona. Social Justice and Special Assistance Minister Dhananjay Munde has informed that.
On the background of Corona, the Commissionerate of Social Welfare should accept the applications of the students who want to avail the benefit of this scholarship by entering the new academic year online or by e-mail. Munde has already given. The students have also expressed satisfaction that the application deadline has been extended by 15 days.
Students pursuing postgraduate courses in the same branch in which a student graduated could earlier avail the benefit of this scheme; However, Dhananjay Munde has recently canceled this condition in the interest of the students. Students who have graduated from any branch will now be able to apply for postgraduate courses in other branches to avail benefits under this scheme. At the same time, the age limit issues in the scheme have now been resolved.
No comments